नभातून मेघांचा समुद्र खवळतो
पुरात संसार सारा उध्वस्त होतो
संकट काळात डोंगर कोसळतो
अश्रूंचा महापुर गावाला घेरतो
निसर्ग मानव जीवनावर कोपतो
शेताच्या छातीवर पाऊस नाचतो
काळीज फाडतो उभं पीक मोडतो
मालकासह जनावर पुरात वाहतो
वासरू गोठ्यात हंबरडा फोडतो
निसर्ग मानवी जीवनावर कोपतो