अहमदनगरचे परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांच्याविषयी त्यांचा स्वतःचा आलेला अनुभव कथन करता येत अरुण देशमुख.
श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामींचा जन्म शुक्रवार, दिनांक फेब्रुवारी १६, १९३४ रोजी म्हणजेच फ़ाल्गुन शुक्ल तॄतीयेला रायतळे नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये झाला. रायतळे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात आहे. त्यांच्या वडिलांचे नाव कॄष्ण होते. ते व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव राधा होते. त्यांचा जन्म मराठी मातॄभाषा असलेल्या घराण्यात झाला. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांना परम ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव , साक्षात्काराच्या रूपाने झाला. त्यानंतर नॄसिंह सरस्वती( गाणगापूर ) स्वामींनी ( जे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार होवून गेले ) श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामींना गाणगापूरला बोलवून घेतले, आणि सदेह दर्शन दिले.नॄसिंह सरस्वती स्वामींनी श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना शिष्य बनवले आणि त्यांना तपश्चर्या करण्यास सांगितले. सद्गुरूंची मागच्या जन्मामध्ये ९० वर्षांची तपश्चर्या झालेली होती आणि त्यांना नॄसिंह सरस्वतींनी ह्या जन्मामध्ये, अजून २५ वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितले. २५ वर्षे तपश्चर्या करून झाल्यानंतर त्यांच्या गुरुदेवांनी, त्यांना आशिर्वाद दिले आणि त्यांना वेद संवर्धन, रक्षण आणि वेदांना पुनर्उपयोगात आणण्याविषयी सर्व सामान्य भक्तांना मार्गदर्शन करावयास सांगितले. वेदांसाठीचे सद्गुरूनी केलेले कार्य हे श्री आद्य शंकराचार्यांनी हजार वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचाच भाग आहे असे म्हणता येईल. स्वामीजींचे जीवन म्हणजे संपूर्ण ब्रम्हचर्य पाळत, कठोरपणे व्यतीत केलेले असे जीवन होते, ज्याची तुलना थोर संत ज्ञानेश्वर आणि रामकॄष्ण परमहंसांच्या जीवनाशी करता येईल.
अरुण देशमुख यांनी क्षीरसागर महाराज या आपल्या गुरूंना कधीच बघितलं नाही पण तरीही त्यांनी प्रत्यक्ष चालू जीवनामध्ये मार्गदर्शन तसेच आशीर्वाद दिले त्यांच्या आलेल्या अनुभवाचे कथन नक्कीच सगळ्यांना आवडेल. मुंबईचे दत्तात्रेय सत्संग मंडळ आणि त्याचे श्रीयुत महेश बापट अध्यक्ष या नात्याने आमच्या घरी सत्संगाच्या बैठकीची पाच प्रश्न घेऊन नियमित यायचे. 2002 ते 2014 सदर पाच प्रश्न आणि त्याची उत्तरे माझी पत्नी सौ अर्चना देशमुख नियमित रित्या करत असायची 2014 च्या दरम्यान तिच्या स्वप्नात शिरसागर महाराज नियमित येत असल्याने सदर टायपिंग सेवा म्हणून करायचे का असे विचारले अर्थातच त्याचे उत्तर होते आणि मग या निमित्ताने मुंबईच्या दत्तात्रेय सत्संग मंडळाची माझा संबंध आला आणि त्या योगे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या नगरच्या निवासस्थानी भेट देण्याचा योग आला त्यानंतर मनोभावे मनातून व्यक्त केलेली माझी इच्छा कशी पुरी झाली आणि आम्ही देशमुख कुटुंबीय त्यांचे कसे भक्त झालो यासंदर्भात या मध्ये माहिती देत आहेत अरुण देशमुख.
#legalmarathi #notary #arundeshmukh #story #informative #legel_Info #marathi #hindi #english #untold_story