Listen

Description

आपल्या विरोधातील कोणत्याही निकालाच्या विरोधात तुम्ही अपीलात जाऊ शकता. निकाल लागल्यास त्याविरुद्ध तुम्ही अपिला जाऊ शकता हा तुमचा एक कायदेशीर अधिकार आहे. अर्थात अपिलात जाण्याकरता तुम्हाला त्या निकालातील दोष वा त्रुटी किंवा तुमच्या बाजूने जी बाजू मांडण्यात आली त्यातील दोष वा त्रुटी दाखवाव्या लागतात.  सर्वसाधारण रित्या दिवाणी निकालात तर थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जात निकाल आणि अपील या दोघांचा खेळ चालू राहतो हे मात्र नक्की