सीआयडी आणि सीबीआय या दोन्ही भारताच्या गुप्तचर आणि तपास संस्था आहेत. सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभाग हा राज्य पोलिसांचा विभाग आहे जो राज्यात घडलेल्या गुन्हेगारी गुन्ह्यांचा तपास करतो तर सीबीआय हा केंद्रस्तरावरील तपास विभाग आहे जो देशभरातील गुन्ह्यांचा शोध घेतो. दोघांमधील फरक फार महत्त्वाचा ठरतो कारण बऱ्याच राज्यांमध्ये केंद्र सरकारने त्यांच्या नेत्यांविरुद्ध सीबीआय चे खाते जाणून बुजून मागे लावल्याचा आरोप नियमितरीत्या होत असतो त्यामुळेच सीबीआय नक्की काय आहे त्याच वेळेला राज्यातील सरकारने सीआयडी माझ्या मागे लावलेली आहेत तेच गुन्हे अन्वेषण विभाग काय म्हणून आहे हे जाणून घेऊया या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून