डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने जगातील विविध घटनांचा अभ्यास करत त्यात परत भारतीय परंपरा आणि लहेजा तसेच तिचं सौंदर्य टिकून राहण्याकरता संशोधन करून आपली आजची भारतीय घटना अर्थात भारतीय संविधान तयार केले. भारतीय घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना असून 26 जानेवारी 1950 ला ती अमलात आणली गेली. आज त्यामुळेच प्रत्येक 26 जानेवारीला आपण गणतंत्र दिवस साजरा करतो.