भारतीय परंपरेमध्ये धन्यवाद म्हणे हे पहिल्यापासून आहे. आपल्यालाच वाटते की इंग्रजांनी सॉरी आणि थँक्यू हे दोन शब्द आपल्याकडे दिले मात्र भारतात अगदी उठल्यानंतर सुद्धा जमिनीला पाया पडून हे धरणीमाता मी तुझ्यावर पाय ठेवतोय आणि तू मला उचलून घेतले माझ्यावर तुझे उपकार आहेत असं म्हणत उभा राहतो... घरातून बाहेर पडताना आई-वडिलांच्या पाया पडतो गुरुजनांचे उपकार मानतो. आपली संस्कृतीच वेगळी आहे. संत परंपरेमधील संत एकनाथ महाराज हे यातील मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी आपल्यावरती 108 वेळा थुंकणाऱ्या एका दुष्ट माणसाला सुद्धा मनापासून माफ केलं इतकंच नाही तर त्याला नमस्कार करुन धन्यवाद दिले आणि सांगितले की तुझ्या मुळे मला 108 वेळा परत परत स्नान घेण्याचे पुण्य लाभले आणि तोच दुष्ट त्यांचा आयुष्यभराचा दास झाला.. या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद किंवा थँक्यू या शब्दांची ताकद थोडक्या शब्दात एड. अरूण देशमुख यांनी तुमच्यासमोर मांडली आहे.