झारीतला शुक्राचार्य ही म्हण कशावरून आली आणि या मागची काय कथा आहे ही कथा या untold मधनं सांगितलेली आहे लायन ॲड अरुण देशमुख यांनी. दैत्याचार्य शुक्राचार्य हे विद्वान आणि राक्षसांचे गुरु त्यामुळे कायम राक्षसांची पाठराखण करण्यात त्यांनी आपली धन्यता मानली. स्वतः महादेवांना प्रसन्न करून त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केलेली ज्यायोगे थेट मेलेल्या राक्षसांना सुद्धा ते जिवंत करू शकत होते. पराक्रमी बळीराजा याच्याकडे ज्यावेळेला स्वतः श्री विष्णू यांनी वामन अवतार घेऊन ब्राह्मण म्हणून याचक या नात्याने हात पुढे केला तेव्हा बळीराजा यांनी आपल्या राजा यांच्या झारीतून वामनाच्या हातावरती पाणी देत करणे दान देण्यास स्वीकारायचं म्हणून पाणी सोडलं तर त्या झारीतच भुंग्या रुपी जाऊन आपल्या बळीराजाचे राज्य वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न गुरु शुक्राचार्य ह्यांनी केला. मात्र वामन अवतारातील श्रीविष्णू यांनी त्यांचा कुटील डाव ओळखला आणि गवताच्या काडीच्या मदतीने त्यांनी भुंगेरूपी शुक्राचार्य जे झारित जाऊन बसले होते त्यांना त्यांनी टोचून बाहेर काढलं. त्या गवताच्या काडीमुळे शुक्राचारांचा एक डोळा मात्र कायमस्वरूपी अधु झाला. त्यानंतर कोणत्याही कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला झारीतला शुक्राचार्य म्हणण्याची पद्धत रूढ झाली. आपण ऐकतो आहोत आपल्या लाडक्या लायन अरुण देशमुख यांच्याकडून