Listen

Description

अंबाजोगाई - अंबाजोगी योगेश्वरी देवी मंदिर हे परळी वैजनाथपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवीच्या शक्तीपीठांपैकी एक प्राचीन मंदिर आहे.   योगेश्वरी हे एक संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ "देवी दुर्गा" आहे. योगेश्वरी मंदिर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी    आहे. शहरातून वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिमेला योगेश्वरी मंदिर आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे.   देवी पार्वतीला श्री योगेश्वरी देवी या नावानेही ओळखले जाते, या ठिकाणी महिषासुर राक्षसाचा वध करण्यासाठी ती अवतीर्ण झाली होती.   देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप.   दांतसूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे पारिपत्य केले. दांतसूरचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस जोगाईचे आंबे आणि पुढे आंबेजोगाई, असे नाव प्रचलित झाले. दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी झाली.   योगेश्वरी कुमारिका आहे. त्यामागे एक कथा सांगितली जाते, परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते आजचे आंबाजोगाई. ११व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले.  देशावरची ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे. हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडित आहे. परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यावर, त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तिथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या १४ व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. या १४ व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईतून वधू नेल्या. वधू नेताना अंबाजोगाई कुटुंबनी एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल, त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल.  अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे. यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, नंतर निजाम अशा विविध राजयकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले आहे. मंदिराला एक मोठे मुख्य प्रवेशद्वार आहे जे पूर्वेकडे तोंड करते. एक 'नगरखाना' - संगीतकारांसाठी जागा आणि 'दीपमल' मुख्य गेटसमोर उभी आहे.   मंदिराला तटबंदी असून उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. देवीचे मंदिर यादवकाळात बांधलेले  दिसत.  मुख्य मंदिर दगडी असून,   देवी उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपात गणपती आणि देवीची उत्सवमूर्ती आहे.  मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेस होमकुंड असून, उत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या शतचंडीचा होम केला जातो. मंदिर परिसरात नगारखान्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे. मंदिरावर असलेला पाच मजली कळस आहे. उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अठरा हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती, ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे.  मंदिरातील तांबूल प्रसाद ही या मंदिरातील अनोखी गोष्ट आहे.      देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.