Listen

Description

बसप्पा धनप्पा जत्ती हे भारताचे उपराष्ट्रपती व कार्यवाहू राष्ट्रपती होते. यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्ह्यात सावळगी गावात झाला. त्यांनी साइक्स लॉ कॉलेज, कोल्हापुर येथे कायद्याचे शिक्षण घेतले व जमखंडी येथे वकिलीचे काम सुरू केले. जत्तींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जमखंडी नगरपालिकेपासून केली.