।। सिताराम राजाराम भज रे मना ।।
सिताराम राजाराम भज रे मना । असा काय नरदेह येईल पुन्हा ।। ध्रु.।।
विषयाचे सुख द्वाड । येथे वाटे बहू गोड । पुढे आहे अवघड यमयातना । सिताराम... ।।१।।
द्रव्यावरी करिसी मौजा । केव्हा येईल यमराजा । घेऊनी जाईल प्राण तुझा यमसदना । सिताराम.... ।।२।।
नामा म्हणे एक करी । हरी चरण दृढ करी । दत्त चरण दृढ धरी । तेणे चुकेल जन्मफेरी नरक यातना । सिताराम.... ।।३।।
#ramkuti
#रामनाम
#sitaram