EP - 35 | विपुल श्री मराठी मासिक माधुरी वैद्य संपादक on Vibrant Mind Pod
सोशल मीडियाच्या उदयामुळे पुस्तक, नियतकलिक वाचनाचा कंटाळा येऊ लागला आहे की काय? या सगळ्या विचारांच्या गदारोळात एक आशेचा किरण दिसतो तो माधुरी वैद्य ताईंच्या रूपात. माधुरी वैद्य म्हणजे विपुल श्री या गेली पंचवीस वर्ष सुरू असलेल्या मराठी मासिकाच्या संपादिका.
प्रा. ग.प्र.प्रधान, प्रा. गं.ना जोगळेकर सारख्या थोर साहित्यिकांच्या मार्गदर्शनामुळे आणि लेखनामुळे विपुल श्री चा दर्जा उत्तरोत्तर वाढतच गेला. नीलिमा बोरवणकर, मंगला गोडबोले या सारख्या चांगल्या लेखिका विपुल श्री शी कायम बांधल्या गेल्या आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही विपुल श्री चा दिवाळी अंक दर्जेदार आहे. अनेक उत्तमोत्तम लेख आणि कथा यात आहेत.
https://wa.me/919922449502 या नंबरवर आपलं नाव, पत्ता, फोन नंबर मेसेज करा आणि एक दर्जेदार दिवाळी अंक वाचायची संधी सोडू नका!