गणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी हि म्हंटल जाते त्या दिवसाला गणेश उत्सव या स्वरूपाने साजरा केले जाते.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींच्या मूर्तीची घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. या उत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य असे आहे की, गणेश उत्सव सार्वजनिक पणे साजरा करण्याची पद्त बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक ह्यांनी केली होती. असे गणेश चतुर्थी सार्वजनिक पद्तीने करण्या मागे टिळकांचा हेतू होता कि सर्व लोकांनी ह्या सणा निमित्त कोणते हि मतभेत न ठेवता एकत्र यावे आणि सण साजरा करावा जेणे करून लोकांन मधे एकी राहील.