कठीण प्रसंगात हार माणून घरात केवळ परिस्थितीला दोष देण्यापेक्षा, जर त्याच परिस्थितीत काही वेगळं करता आलं तर ते अधिक उत्तम..नांदेड शहरातील प्राचार्य दुर्गादेवी कच्छवे यांनी देखील लॉकडाऊन च्या काळात एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्या नांदेडमधील म्हाडा कॉलनीतील अनाथ आणि गरजू मुलींना, त्यांच्याच घरी शिवणकाम आणि हस्तकला यांचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. आज MH 935 मध्ये ऐका दुर्गादेवी कच्छवे यांना