काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने पुन्हा एकदा घोळ घातला. सीएआयने आज एक अहवाल प्रसिध्द केला. या अहवालात देशातील कापूस उत्पादन २९४ लाख गाठी नाही तर ३०९ लाख गाठी झाल्याचं सीएआयनं म्हटलं. मग आता आपल्या कापूस भावाचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण जसं उत्पादन वाढवलं तसं इतरही काही गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्या कापूस बाजाराला सपर्ट आहे. मग काय आहे या सीएआयच्या अहवालात? उत्पादन वाढल्याचा अहवाल आलामुळे कापसाचे भाव पडतील का? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.