देशात यंदा मक्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर निर्यातीसाठी मागणी चांगली आहे. त्यामुळे दरही टिकून आहेत. सध्या मक्याला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. पण पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून मका निर्यातबंदीसाठी लॉबिंग सुरू आहेत. या स्थितीत पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहील, मक्याचे दर वाढतील का, याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.