Listen

Description

देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. त्यातच केंद्र सरकारने तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटले. त्यातच सध्या निर्यातीसाठी मागणी नाही. बाजारातील आवकही वाढत आहे. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे उत्पादन किती झाले? मका बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.