देशातील मुगाचे उत्पादन यंदा वाढल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. त्यातच मध्य प्रदेशसह काही बाजारांमध्ये उन्हाळी मुगाची आवक वाढली. याचा दबाव दरावर आला. अनेक बाजारात दर ४०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. मग सध्या मुगाला काय भाव मिळतोय? मुगाच्या दरात पुन्हा वाढ होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.