मागील वर्षभरात पामतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशात सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयात वाढली. तसेच देशात सोयाबीन दरही तेजीत होते. मात्र सध्या पामतेल स्वस्त झालं आणि सोयाबीनमधील तेजी कमी झाली. मग पामतेल आणि सोयाबीनचा संबंध काय? देशात सोयाबीनचे दर काय आहेत? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.