देशात सध्या तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. तर बाजारात हरभरा आणि मसूरची आयात सुरु आहे. सध्या हरभरा आणि मसूर हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहेत. पण निम्म्या अधिक कडधान्याचे भाव तेजीत असल्यानं सरकारचा आयातीवर जोर आहे. पण २०२२-२३ च्या हंगामात भारताची कडधान्य आयात कमी झाली. मग तूर आणि हरभरा आयातीचं चित्र कसं राहीलं? आयात कशामुळं कमी झाली? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.