देशातील बाजारात सध्या तुरीची आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं यंदा शेतकरी सोयाबीन आणि कापसाप्रमाणं तुरीचीही विक्री गेरजेनुसार करतील की काय? अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. पण खरंच यंदा शेतकऱ्यांच्या विक्रीवरचं तुरीचे दर ठरतील का? तुरीला यंदा काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.