Listen

Description

संताजीबाबा नावाचं वादळ काय होतं हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये "संताजी"कार श्री काका विधाते यांच्याकडून..
गनिमी कावा ही मराठ्यांची पूर्वापार युध्दपध्दती ! संताजीने ती अचूक आणि धारदार बनवून इतक्या प्रभावीपणे ती वापरली, की हिंदुस्तान, अफगाणिस्तान, बल्ख टकशानपर्यंतच्या अवाढव्य प्रदेशात अजेय, अपराजित ठरलेल्या बलाढ्य मोगली लष्कराचा सास उखडून गेला. कायम विजयाच्या घमेंडीत वावरणारं ते सैन्य महाराष्ट्राच्या भूमीत पराभूतासारखं वावरू लागलं. त्याच्याशी लढण्याचे, त्याला प्रतिकार करण्याचे धैर्य एकाही मोगल अमिरात नव्हते. इतकी त्याच्या नावाची दहशत होती. त्याने शाही लष्कराचे केलेले प्रत्येक नुकसान थरकाप उडवणारे होते. एका पाठोपाठ एक भयंकर आघात झाल्यामुळे मोगल सैन्याचं धैर्यच खचून गेलं. पुढे पुढे तर संताजीशी लढण्याऐवजी त्याला खंडणी देऊन आपला इलाका वाचवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला.

संताजी कादंबरी ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/santaji

पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939

Credits:
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Connect with us:
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #marathibooks #SantajiGhorpade