Listen

Description

सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग अंतर्भूत केला जातोय पण आपल्याकडे मात्र अजूनही त्याबाबतीत औदासिन्य आहे. आपल्याकडे योग म्हणजे योगासने, हे समीकरण अतिशय घट्ट रुजलेले आहे. पण मग योग म्हणजे नेमके काय? बरेच वर्षे योग करणार्‍या लोकांनाही अष्टांग योग कळत नाही. योग आणि ध्यानाच्या मागचे विज्ञान काय आहे? योगामुळे खरेच वजन कमी होते?

योगामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो? प्राणायामामुळे मन:शांती मिळते? योग आणि अध्यात्म याचाही संबंध आहे, तो कसा? या सर्व विषयांवर या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारल्या आहेत

श्री अनिल फडणवीस सरांबरोबर. फडणवीस सर संत साहित्य अभ्यासक तर आहेतच पण ते योग अभ्यासक आणि योग शिक्षक देखील आहेत. त्यांच्या "आनंद योग - ध्यानासाहित" या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या निमित्ताने निरंजन मेढेकर यांनी हा संवाद साधला आहे.

अनिल फडणवीस यांनी लिहिलेले आनंद योग पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-

https://granthpremi.com/products/anand-yog

अथवा खालील नंबर वर संपर्क करा

WhatsApp Message Only : +91 85509 31939

(स. 10.30 ते स. 6)