Listen

Description

'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून प्रार्थना बेहरेनं अभिनयक्षेत्रातील आपल्या प्रवासाला सुरुवात केली पण त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा','कॉफी आणि बरंच काही','मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी','व्हॉट्स अप लग्न','अजिंक्य','मितवा'असे अनेक मराठी सिनेमे तिनं एकामागोमाग केले अनं मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं असं एक स्थान निर्माण केलं. तब्बल ११ वर्षांनी तिनं पुन्हा छोट्या पडद्यावर काम करायचं ठरवलं अनं 'माझी तुझी रेशीम गाठ' मालिकेतनं ती नेहाच्या भूमिकेत आपल्याला भेटली.  आज 'परीची आई' म्हणून झालेली ओळख तिला प्रिय वाटते. पण त्याचवेळी प्रत्यक्ष आयुष्यात आई बनण्याविषयीचं मतही तिनं बिनधास्त मांडलंय. या आणि अशा अनेक विषयांवर प्रार्थनासोबतचा हा मनमोकळा संवाद सकाळ unplugged कार्यक्रमात नक्की ऐका.