कवितासंग्रहाची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/davbhijaleee-vahee-thava-bhajal-vaha
"फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे."
- मंगेश पाडगावकर
Book: Davbhijalee Vahee
Poet: Himanshu Kulkarni
Podcast Host: Vandana Bokil-Kulkarni
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#davbhijaleevahee #marathipodcasts #poetry
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices