Listen

Description

राजहंसी मोहोरच्या या नवीन व्हिडिओ पॉडकास्टमध्ये लेखिका विशाखा पाटील यांच्याशी राजहंस प्रकाशनाचे सल्लागार संपादक प्रशांत दीक्षित यांनी विशेष संवाद साधलाय. धागे अरब जगाचे, कल्चर शॉक - आखाती देश, सावध ऐका आणि जॉर्ज ऑर्वेल अशा उत्तमोत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या लेखिका अशी विशाखा पाटील यांची ओळख आहे. विशाखाताई या बहारिनस्थित असून, आखाती देशांची संस्कृती, समाजकारण, राजकारण यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. गेले वर्ष-दीड वर्ष सुरू असलेला इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षावरही त्यांनी या पॉडकास्टमध्ये त्यांची निरीक्षणं नोंदवली असून, भारतासोबतचे आखाती देशांचे संबंध नेमके कसे आहेत यावरही त्यांनी आपले विचार मांडले आहेत.

राजहंसी मोहोरच्या व्हिडिओ पॉडकास्ट मालिकेत दर दोन महिन्यांतून एकदा राजहंसी लेखकांशी संवाद साधला जाणार आहे.

Bahrain-based author Vishakha Patil shares her observations on the unique culture and fast-changing geopolitical situation of the Arab world in this special video podcast by Rajhansi Mohor.

Guest: Vishakah Patil
Host: Prashant Dixit
Edit and Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Location: V-render Studio  @V-render 
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  @soundsgreatnm 

#geopolitics #arabworld #vishakhapatil #rajhansprakashan #marathipodcast
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices