विविध माध्यमांमध्ये आपल्या लेखणीचा ठसा उमटवित स्टोरीटेलच्या माध्यमातून श्राव्य माध्यमाला आपलंसं करते, तिथे दर्जेदार ओरिजनल सिरीज लिहिते, त्यांना रसिक श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभतो अन् मग सुरु होतो त्या लेखिकेचा श्राव्यलेखनाचा आगळा प्रवास. होय....गौरी पटवर्धन. स्टोरीटेलची आघाडीची लेखिका. बालमित्रांसाठी ‘मिशन हिमालय’, ‘अळी आणि कोळी’, ‘डॉल हाऊस’ या ऑडिओ बुक्सचा खजिना घेऊन आल्यानंतर गौरी यांनी ‘फिरंग’, ‘फिरंग २’, ‘तो ती आणि तिचा तो’ ही वेगळ्या धाटणीची पुस्तकं आपल्यासमोर आणली... आपला आजवरचा लेखनप्रवास, त्यात लाभलेले यश आणि त्यात दडलेलं सिक्रेट वगैरे खुद्द गौरीकडून ऐका उर्मिलासोबत रंगलेल्या या पॉडकास्टमधून.