Listen

Description

लहानपणापासूनच अभिनय, लेखन, साहित्याची परंपरा असलेल्या कुटुंबात तो मोठा झाला... सगळ्यांनाच अभिनेता व्हायचं असतं, याला मात्र लेखन, दिग्दर्शनात रस... आई-वडिलांनी लावलेली वाचनाची सवय, आजोबांचा दर्जेदार अभिनय, आजोळी पणजोबांच्या समृद्ध साहित्याचं गारूड, आजी-आजोबांचं भाषाज्ञान या सर्व गोष्टी आत्मसात करून लेखक, दिग्दर्शक, अभिनेता विराजस कुलकर्णी याने सर्जनशीलतेची कास धरत, अथक परिश्रम घेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. एकाच वेळी अनेक प्रांतात स्वतःला सिद्ध करणाऱ्या या प्रतिभावंताच्या कलात्मक जडणघडणीबाबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत संतोष देशपांडे यांनी... जरूर ऐका!
 
 विराजस कुलकर्णीचा आवाज लाभलेली 'रूमाली रहस्य' आणि 'कृष्णवेध' ही ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
 https://www.storytel.com/in/en/search-Virajas+Kulkarni

स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.