जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मेघनानं या पॉडकास्टमध्ये दिली आहेत... याशिवाय तिचा आवाजाच्या विश्वातील प्रवासही तिनं उलगडून दाखवलाय... स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी मेघनाला बोलतं केलं आहे, तेव्हा चुकूनही चुकवू नका हा कट्टा!
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.
मेघना एरंडेची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-meghana+erande
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans