कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेला आपण सर्वांनी कसं सामोरं जायला हवं, कोरोनाची नवीन लक्षणं कोणती, व्हॅक्सिनबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, ऑक्सिजनची समस्या नेमकी कशी हाताळता येऊ शकते, लस घेतल्याने संसर्गापासून कितपत बचाव होतो, रेमडिसिवीर कोणी घ्यावं, सिटी स्कॅन तपासणीतून नेमकं काय निदान होतं या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत पुण्यातील प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी. स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांच्या समवेतचा या आरोग्य संवादामधून डॉ. स्वप्निल यांनी कोरोना संदर्भातील केलेलं मार्गदर्शन आजच्या घडीला आपणा सर्वांसाठी अत्यंक उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा चुकवू नये, असा हा पॉडकास्ट ऐका... सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि फिट राहा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात कोणत्या नव्या गोष्टी आपल्या भेटीस येणार आहेत याबाबत प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans