आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केलेले लेखक वसंत वसंत लिमये यांना संतोष देशपांडे यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर बोलतं केलं आहे. २०१२ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरी लेखनाची प्रक्रिया कशी होती, ती कशी साकारली या सर्व प्रवासाबद्दल लिमये यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. नुकतीच ही कादंबरी स्टोरीटेलवर ऑडिओबुकच्या स्वरूपात रिलीज झाली आहे, तेव्हा ही कादंबरी ऐका आणि थरार अनुभवा!
याशिवाय स्टोरीटेलने नवीन सिलेक्ट हा प्लॅन सुरू केला आहे. यात ११ भारतीय भाषांमधील साहित्य ऐकायला मिळेल. सध्या २९५ रूपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ही माहिती दिली आहे स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगश दशरथ यांनी. तेव्हा लगेच स्टोरीटेल सबस्क्राईब करा.
'लॉक ग्रिफिन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2369103-Loch-Griffin
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans