स्टोरीटेलवर गाजत असलेल्या मृत्योपनिषद या ओरिजिनल कादंबरीचे लेखक हृषीकेश गुप्ते आणि त्यास आवाजाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे प्रसिद्ध अभिनेता, कलाकार किशोर कदम यांच्याशी रंगलेली ही गप्पांची मैफल. एका रहस्यमय कादंबरीच्या निर्मितीचा वेध घेणारा संवाद तितकाच उत्कंठावर्धक होय.