डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसावर नितांत प्रेम करणारे बहुपैलू व्यक्तिमत्व. वाचनाचे आपले स्वतःवर झालेले संस्कार उलगडून दाखवतानाच वाचनसंस्कृतीबाबत निरीक्षणंही ते स्टोरीटेल कट्ट्यावर सागर गोखलेंसमवेत झालेल्या या गप्पांमधून उलगडतात. ऐकायलाच हवा असा संवाद प्रत्येकाला नक्कीच अंतर्मुख करुन जातो.