आज आपल्यासोबत आहेत अभिजित पेंढारकर, हृषिकेश निकम आणि सुनिला गोंधळेकर. होस्ट आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर!
आणि निमित्त...?
निमित्त आहे ‘बेडटाईम स्टोरीज’चे!
लहान असणं आणि गोष्ट हे एक न तुटणारं नातं असतं. लहान मुलांना गोष्टी सांगायला सगळ्यांना आवडते. किंबहुना ते ऐकणे जास्त जवळचे. त्याच निमित्ताने ही तीन व्यक्तिमत्त्वं स्टोरीटेलच्या ‘बेडटाईम स्टोरीज’ रचायला जमले.
तीन मोठी माणसं जेव्हा मुलांच्या दृष्टीकोणातून विचार करतात, त्यांच्याच वयाचे होऊन ह्या कथा रचतात आणि ते देखील ह्या नवीन डिजिटल युगातील मुलांच्या मानसिकतेचा विचार करून. ह्या स्टोरीज कश्या सुचल्या? त्यामागच्या काही आठवणी, काही किस्से, त्यांच्या ह्या सर्व उद्योगांचे, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे किस्से बाकी देखील धमाल आहे या पॉडकास्टमध्ये.
तर नक्की ऐका आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.
बेडटाईम स्टोरीज- खेळ नगरी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
बेडटाईम स्टोरीज- शिवगड ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.