स्टोरीटेलवर ‘ऑक्टोबर’मध्ये काय?
हा ऑक्टोवर महिना सण आणि सुट्ट्यांचा!
मग नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी अश्या सुट्ट्यांची आधीच बेगमी करून घ्यायला हवी ना?
मग स्टोरीटेलतर्फे ऑक्टोबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला.
त्यात ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ची ‘फर्जंद’ ही नवीकोरी भेट येत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेली आणि अजय पूरकर यांच्या आवाजात.
त्याबरोबरच समाजातील ‘खरेखुरे आयडॉल्स’सुद्धा भेटीला येत आहे, ज्यात समाजात राहून समाजाचे देणे फेडणारे आणि स्वत:च्या अथक परिश्रम आणि मेहनतीने समाजाला घडवणारे आयडॉल्स आहेत. उदा. मंदा आणि प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, रुपा कुलकर्णी, गिरीश प्रभुणे किंवा नरेंद्र दाभोळकर असे.
याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या.
त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या स्टोरीटेलच्या खंद्या पब्लिशर्सना!
तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.