Listen

Description

आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक ‘टॅबू’ मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते.

‘सेक्स’ हा देखील त्यातच येतो.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत.

त्यातील ‘काम’ विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण ‘सेक्स’च्या बाबतीत मानतो.

सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं.

मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं.

त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही.

तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या ‘टॅबू’ विषयावर बोलण्यासाठी!



निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर ‘सेक्सवर बोल बिनधास्त’ ह्या सिरीजचं!



तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर!



 ‘सेक्सवर बोल बिनधास्त’  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.



स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.