स्टोरीटेल ओरिजिनल सिरिज विभागात नुकतीच दाखल झालेली इप्सिता म्हणजे एक भन्नाट गोष्ट. लेखक तुषार गुंजाळच्या शब्दांतून आणि यशपालच्या आवाजातून साकारलेली ही एक उत्कंठावर्धक गोष्ट. आमच्या रसिक श्रोत्यांना त्याची एक छोटीशी झलक ऐकायला मिळावी, यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर सादर आहे.
इप्सिता बद्दल -
स्वतःची व्हर्जिनिटी घालवण्यासाठी आणि त्यायोगे आयुष्यातल्या हरलेपणावर मात करण्यासाठी ४० वर्षांचा प्रदीप भैसाटतो आणि स्वत:च्याही नकळत व्हिलन बनत आजवर जे जे केलं नाही ते सगळं करू लागतो. मग ते अक्षरशः काहीही असो. प्रदीप आता कोणाची आणि कशाचीही तमा बाळगणार नाहीये.