Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free
Title: 50: स्टोरीटेल कट्टा... नाबाद ५0
Author: Storytel India
Narrator: Storytel Marathi
Format: Unabridged
Length: 0:14:50
Language: Marathi
Release date: 08-24-2019
Publisher: Storyside AB India
Genres: Non-Fiction, Art & Music
Summary:
स्टोरीटेल कट्टा... नाबाद ५0
बघता बघता स्टोरीटेल कट्ट्याने ५० वा पॉडकास्ट पूर्ण केला देखील!
मराठी वाचनसंस्कृती कूस बदलत आहे. ती आता तंत्रज्ञानाच्या मदतीने श्राव्य माध्यमातून आपलं साहित्य वैभव फुलवित आहे. त्याचाच वेध घेण्याच्या दृष्टीने स्टोरीटेल कट्टा सुरू झाला.
एका गिर्यारोहकाला प्रश्न विचारला होता, 'तुम्ही डोंगर का चढता?'
त्याने शांतपणे उत्तर दिले, 'कारण ते त्याच साठीच असतात.'
हाच प्रश्न आणि उत्तर जरासे बदलून 'तुम्ही पुस्तकं का वाचता?' असा देखील होऊ शकतो.
पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच असे निवांत पुस्तक घेऊन वाचणे शक्य नसते. मग त्यावरचा एक अनोखा उपाय म्हणजे 'ऑडिओबुक्स!'.
ऑडिओबुक्स ही प्रवासाच्या धांदलीत काही क्षण काढून निवांत ऐकता येतात. शिवाय ती मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध असल्याने ती सोबत बाळगणे देखील सोपे असते.
त्याच दृष्टीने काय ऐकावं? काय चांगले आहे आणि काय ऐकायला आवडते? ह्या प्रश्नांमध्येच 'स्टोरीटेल कट्ट्या'च्या जन्माची मूळं आहेत.
स्टोरीटेल कट्ट्याच्या पॉडकास्टस्ची स्वत:ची वेगळी वैशिष्ट्यं आहेत. केवळ ऑडिओबुक्सच नव्हे तर वाचनसंस्कृती, त्याच्याशी जोडली गेलेली माणसं, त्यांची मनं ही इथल्या रंगलेल्या पॉडकास्टस्मधून आपल्या भेटीला येतात.
आजचा हा ५० वा पॉडकास्ट सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आजवरच्या या प्रवासात आम्हाला लाभलेले सर्व मान्यवर पाहुणे, श्रोते, रसिक, वाचक तसेच हा 'स्टोरीटेल कट्टा' रंगविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे सूत्रसंचालक, निवेदक, आमचे तंत्रज्ञ, सहकारी अशा सर्वांचे मनापासून आभार!
आजचा हा ५०वा पॉडकास्ट जरासा वेगळा आहे.