Listen

Description

महाराष्ट्रातील पारंपरिक मांसाहारी पदार्थांविषयी जाणून घेताना गेल्या एपिसोडमध्ये आपण मटन आणि चिकनच्या डिशेश बद्दल बोललो.आता ज्या राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे,त्या राज्यात ताज्या फडफडीत माशांना पानात मानाचं स्थान मिळणारचं ना ? पापलेटच्या हुमणापासून ते बांगड्याच्या कालवणापर्यंत कोकणातल्या ट्रॅडिशनल डिशेशची यादी बरीच मोठी आहे.जोडीला कोलंबीचं लिप्त,भरलेले बोम्बील,खेकड्याचं कालवण,तिसऱ्यांचा रस्सा अशा एकापेक्षा एक चवदार पाककृतींमुळे सागरातले मासे जेवणाच्या पानातही मजा आणतात.

तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी.

Speaking about the non-vegetarian Maharashtrian delicacies, we had a look at the various mutton and chicken dishes in the last episode. However, in a state that boasts a 720-kilometer coastline, how can we miss out on the seafood?! From Pomfret’s Humana to Mackerel’s Kaalvan, the list of traditional seafood dishes from Konkan runs quite long. Moreover, lip-smacking dishes like Prawns Lipta, Stuffed Bombay Duck, Crab Kaalvan, and Clam Rassa only add to the riches and delights of a Maharashtrian non-vegetarian thaali.

For more such wonderful insights, be sure to tune in to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.