Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831165 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Hirkani Author: Anagha Kakde Narrator: Multiple Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 0 minutes Release date: July 10, 2020 Genres: History & Culture Publisher's Summary: 'रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी'. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच – 'हिरकणी'. गडाचे सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले कि, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली.अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला.रयतेवर मातेसारखं प्रेम करणाऱ्या राजाचा आदेश मोडायचा की आईचं कर्तव्य पार पाडायचं? या द्विधा मनस्थितीत असताना आपल्या आगळ्याच साहसाने इतिहासात नाव कोरणाऱ्या असामान्य आई ची कहाणी...'हिरकणी'