Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Rajhans Prakashan

Shows

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorपेरूची पार्टी | Rajhans Prakashan | Children Storiesमे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. संजीवनी बोकील लिखित पेरूची पार्टी ही गोष्ट आयूष जोशी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Anandachi Phule Author: Sanjivani Bokil Narrator: Ayush Joshi Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-1608 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorचिरतरुण स्वर: आशा भोसले | Asha Bhosale | Rajhans PrakashanBook link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chirtarun-swar-asha-bhosale-caratanprnae-savara-aasha-bhasal आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची...गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद...चुकवू नये अशी मैफल... Book: Chiratarun Swar Asha Bhosale Author: Suhas Kirloskar Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-1436 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorअबोली | Rajhans Prakashan | Children Stories | Aboliमे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित अबोली ही गोष्ट मीरा दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Chotyancha Motha Plan ani Itar Goshti Author: Mugdha Shewalkar Narrator: Meera Dandekar Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-1311 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorकोल्होबाची युक्ती | Rajhans Prakashan | Children Storiesमे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित कोल्होबाची युक्ती ही गोष्ट सहावीतल्या शर्व कुलकर्णी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: Samadhan Shiketod Narrator: Sharva Kulkarni Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-0908 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorकहाणी एका आधुनिक सुश्रृताची! | Dr Shailesh Puntambekar | Dr Chitralekha PurandareBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/skalpel-te-skopee-te-robo-sakalpal-ta-sakapa-ta-rab ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रृताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला हा वेध. Book: Scalpel te Scopy te Robot Author: Dr Chitralekha Purandare Special Guest: Dr Shailesh Puntambekar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-0743 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorछोट्यांचा मोठा प्लॅन | Children Stories Special | Rajhans PrakashanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chhotyancha-motha-plan-ani-itar-goshtee-chhatayaca-matha-palna-aanae-itara-gashhata मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित छोट्यांचा मोठा प्लॅन ही गोष्ट चौथीतल्या गार्गी वैद्य हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Chotyancha Mothya Goshti Author: Mugdha Shewalkar Narrator: Gargi Vaidya Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-0612 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorभारत पाकवर सर्जिकल स्ट्राईक करेल? | War Against Terrorism | Indo-Pak Situation२२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची नृशंस हत्या केल्यावर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यदलांना कारवाईचे दिलेले पूर्णाधिकार तर दुसरीकडे भारत पाकवर हल्ला करणार असल्याचं पक्कं इंटेलिजन्स असल्याचं पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य या सगळ्यातून भारत-पाक युद्ध अटळ आहे की २०१६ आणि २०१९ प्रमाणे भारत पाकिस्तानवर सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करेल हे प्रश्न निर्माण होत आहेत. Special Guest: Shridhar Loni Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #shakespeare #englishliterature #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-0529 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorभारतद्वेषाची पाकिस्तानी गोष्ट | Pahalgam Terrorist Attack | Shridhar Loniपाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनिर यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या पाचच दिवस आधी अनिवासी पाकिस्तानींसमोर एक मोठं भाषण केलं होतं. त्यात त्यांनी पाकिस्तानची गोष्ट पुढच्या पिढ्यांवर बिंबवण्याचं आवाहन केलं होतं. ही पाकिस्तानी गोष्ट नेमकी काय आहे आणि त्या गोष्टीत सांगितलेली उक्ती दहशतवाद्यांनी पहलगामच्या हल्ल्यात कृतीत उतरवली का, याविषयी सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाचे लेखक श्रीधर लोणी. Special Guest: Shridhar Loni Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #shakespeare #englishliterature #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-05-0235 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorशेक्सपिअरला आठवताना | World Shakespeare Day Special | Rajhans Prakashanदरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक शेक्सपिअर दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाचे संपादक आणि शेक्सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक शिरीष सहस्रबुद्धे यांनी शेक्सपिअरच्या कलाकृतींचे, त्याच्या साहित्याचे केलेले हे सखोल विश्लेषण.. World Shakespeare Day Special Special Guest: Shirish Sahasrabuddhe Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #shakespeare #englishliterature #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-04-3035 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorवाचाल तर समृद्ध व्हाल, पण कसं? | World Reading Day Special | RajhansIn this special episode, author Sanjay Bhaskar Joshi explains why reading is important, how to read, and the abundant benefits of being an avid reader.World Reading Day Special Episode Author: Sanjay Bhaskar Joshi Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan...2025-04-2326 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor६४ घरांच्या गोष्टी | Raghunandan Gokhale | Rajhans | Marathi Book ReviewBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/64-gharanchya-goshtee-gharacaya-gashhataतुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे! बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची एक रोचक सफर घडवते. बॉबी फ़िशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनपासून गुकेश, हंपीपर्यंत नानाविध खेळाडूंची भेट घडवणाऱ्या रघुनंदन गोखले लिखित ६४ घरांच्या गोष्टी या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.Book: 64 Gharanchya Goshti Author: Raghunandan Gokhale Podcast Host: Jayant Gokhale Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-04-1639 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorशिवरायांचं कार्य कॉर्पोरेटलाही प्रेरणादायी! | Dr. Ajit Apte | Marathi Podcast | Rajhans PrakshanBook Link : https://www.rajhansprakashan.com/product-details/shree-shivray-set-of-3-booksछत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुस्तद्दी राजकारणी होते आणि धुरंधर सेनानी होते. याबरोबरच ते कुशल प्रशासक होते, अर्थतज्ज्ञ होते आणि मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारे व्यवस्थापकही होते. शिवरायांच्या कुशल प्रशासनाची, प्रभावी व्यवस्थापनाची आणि यशस्वी अर्थकारणाची अभ्यासू मांडणी म्हणजे डॉ. अजित वामन आपटे लिखित श्रीशिवराय IAS?, श्रीशिवराय MBA Finance? आणि श्रीशिवराय VP HRD? हा तीन पुस्तकांचा संच. या आगळ्यावेगळ्या पुस्तकांविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.Book: Shivrai IAS?, Shivray VP HRD?, Shivray MBA Finance? Author: Dr. Ajit Vaman Apte Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-04-0938 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorसमलैंगिकतेचं समग्र चित्रण | Apule Apan | Book ReviewBook Review: https://www.rajhansprakashan.com/product-details/apule-apan-aapal-aapanaeआपल्या समाजात काही विषयांवर बोलणं-व्यक्त होणं निषिद्ध समजलं जातं. समलैंगिकता हा असाच एक विषय. समलैंगिकता ही नैसर्गिक आणि अगदी स्वाभाविक गोष्ट असली तरी याविषयी कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. जैत लिखित आपुले आपण हे पुस्तक समलैंगिकतेविषयी वास्तवदर्शी विवेचन करतं. या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या भागात.Book: Apule Apan Author: Jait Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-04-0243 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorMohemmad Rafi Vishesh | Dr Mrudula Dadhe | Rajhans PrakashanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/navrasancha-jadugar-mohammad-rafi-navarasaca-jathagara-mahamamatha-rafaमोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब..प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण...Book: Navarasancha Jadugar Mohemmad Rafi Author: Dr. Mrudula Dadhe Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-03-2641 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorनागरिकत्व दुरूस्ती कायद्याची सखोल ओळख | Sheshrao More | Rajhans PrakashanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nagarikatva-durustee-kayada-nagarakatava-tharasata-kayathaआपल्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूळ कायदा काय आहे तसंच भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठराविक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नवीन कायदा नेमका कसा आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. या कायद्याच्या विविध पैलूंचा वेध घेणारे शेषराव मोरे लिखित नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनात्मकता व वास्तवता हे नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय.Book: Nagrikatva Durusti Kayda Author: Sheshrao More Guest: Niranjan AgasheHost: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-03-1923 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorWhat's the Future of Audio Podcasts in the wave of Video?Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vishwasamvaadन्यू मीडिया अर्थात नवीन माध्यमांचा विचार करता पॉडकास्टिंगनं गेल्या चार-पाच वर्षांत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विश्वसंवाद हा मराठीतला पहिला पॉडकास्ट हा अमेरिकास्थित सॉफ्टवेअर व्यावसायिक मंदार कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये सुरू केला. गेल्या आठ वर्षांत विश्वसंवाद पॉडकास्टवर येऊन काही पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित निवडक विश्वसंवाद हे पुस्तक राजहंसने प्रकाशित केलं आहे. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं पहिलंच उदाहरण ठरलेल्या या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.Book: Nivadak Vishwasamwad Author: Mandar Kulkarni Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-03-1228 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorSonali Kulkarni | Exclusive Podcast | So Cool Take 2 | Marathi BookRenowned actress and author Sonali Kulkarni talks extensively about her love for writing and how she crafted the book So Cool Take 2 in this special podcast with veteran journalist and editor of her book Alhad Godbole.So Cool Take 2Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/so-cool-take-2Author: Sonali KulkarniPodcast Host: Alhad GodboleSignature Tune: Gandhaar SangoramCover Design: Veerendra TikheExecutive Producer: Niranjan MedhekarRecording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Distribution: SoundsGreat NM...2025-03-0529 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorमराठी भाषा गौरव दिन विशेष | Dr. Sadanand Borse | Marathi Podcast३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी. त्या भाषेत समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असावी. हे साहित्य मूळ त्याच भाषेत लिहिलेलं असावं. अनुवादित नसावं. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं. असे हे निकष आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा मराठी भाषा गौरव दिन विशेष ठरणार आहे. यानिमित्तानं राजहंस प्रकाशनाचं मराठी साहित्यातील योगदानाविषयी राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.Special Interaction: Dr. Sadanand BorsePodcast Host: Mohini MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design: Veerendra TikheExecutive Producer: Niranjan MedhekarRecording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-02-2630 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorपाकिस्तान का मतलब क्या? | Shridhar Loni | Rajhans Prakashan | EP 43Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/pakisthan-ka-matlab-kya-pakasatana-ka-matalb-kayaपाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण पाकिस्तानला तो पडतोय. ‘पाकिस्तान का मतलब क्या?’ हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो. उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्यानं कडवा भारतविरोध जोपासला जातो. धार्मिक ओळख कमी करावी तर वेगळेपण काय राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या या देशाच्या आजवरचा प्रवासाचा वेध म्हणजे श्रीधर लोणी लिखित पाकिस्तान का मतलब क्या? हे पुस्तक.Book: Pakistan Ka Matlab Kya? Author: Shridhar Loni Podcast Host: Abhijit Thite Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-02-1936 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorमाणूस असा का वागतो? | Anjali Chipalkatti | Marathi Podcast | EP 42Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/manoos-asa-ka-vagato-manaesa-asa-ka-vagataनैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ?Book: Manus Asa Ka Wagto Author: Anjali Chipalkatti Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-02-1231 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorMadhav Gadgil Vishesh | Part 2 | Rajhans Prakashan | EP 41Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanaeपद्मभूषण माधव गाडगीळ यांच्याशी शास्त्रज्ञ-संशोधन डॉ. मंदार दातार हे संवाद साधताहेत. निमित्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागानं नुकतंच Champions of The Earth या पुरस्कारानं माधव गाडगीळ सरांना सन्मानीत केलंय. या विशेष भागाचा हा उत्तरार्ध..Book: Suranchi Samradnyi Lata MangeshkarAuthor: Dr. Mrudula DadhePodcast Host: Mohini MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Niranjan MedhekarRecording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-02-0522 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorMadhav Gadgil Vishesh | Special Interaction | Rajhans Prakashan | EP 40Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanaeपद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या साऱ्यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागाने नुकतेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या विशेष निमित्तानं निमित्तानं या ज्येष्ठ निसर्गवैज्ञानिकांशी संवाद साधताहेत शास्त्रज्ञ-संशोधक डॉ. मंदार दातार..Book: Sahyachala Ani Mee Ek Prem Kahani Author: Madhav Gadgil Podcast Host: Dr. Mandar Datar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #madhavgadgil #rajhansprakashan #bookreview Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-01-2937 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorLata Mangeshkar Vishesh | Dr. Mrudula Dadhe | Rajhans PrakashanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suranchi-samaradnee-lata-mangeshkar-saraca-samarajania-lta-magashakaraसंगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणातबसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने...Book: Suranchi Samradnyi Lata MangeshkarAuthor: Dr. Mrudula DadhePodcast Host: Mohini MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Niranjan MedhekarRecording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#latamangeshkarsongs #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-01-2241 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorधरणसूक्त | Award Winning Novel | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dharansukta-thharanaesakataएखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात? एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी.Book: DharansuktaAuthor: Vilas Shelke Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #bookreview #maharashtrafoundationawards #marathibooks #vilasshelke Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-01-1539 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorसाठवणीतील गाणी | Mohammad Rafi | Kishore Kumar | Lata Mangeshkar | Asha BhosaleBook Set Link: https://www.rajhansprakashan.com/book-storeस्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळातील चार लखलखती नक्षत्र म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले आणि किशोर कुमार. या चार गायकांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हज़ारो गाण्यांपैकी प्रत्येकी २५ गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि डॉ. मृदुला दाढे लिखित चार नवीन पुस्तकं साठवणीतील गाणी या मालिकेअंतर्गत नुकतीच राजहंसने प्रकाशित केली आहेत.Book: Awajacha Awaliya Kishor Kumar, Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar, Chirtarun Swar - Asha Bhosale, Navrasancha Jadugar Mohammad RafiEditor: Shirish SahasrabuddhePodcast Host: Niranjan MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Mohini MedhekarRecording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#rajhansprakashan #bookreview #rafi #kishorekumar #ashabhosle #latamangeshkar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-01-0827 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor36. Kishor Kumar Life Journey and Songs | Suhas Kirloskar | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/aawajacha-awaliya-kishor-kumar-aavajaca-avalya-kashara-kamaraहिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. ‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर...‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. ‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर...‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा. या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण...Book: Awajacha Awaliya Kishor Kumar Author: Suhas Kirloskar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #kishorekumar #newbook #marathibookreview #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2025-01-0136 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor35. ऐवज विचारांचा | स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष | Rajhans Prakashan | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/aiwaj-vicharancha-aivaja-vacaracaभोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चश्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्रा. स. ह. देशपांडे हे वैचारिक महाराष्ट्राला परिचित असणारे एक नाव. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले आणि महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेले ऐवज विचारांचा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.Book: Aiwaj VicharanchaAuthor: Prof. S. H. Deshpande Podcast Host: Niranjan Agashe and Dr. Chandrahas Deshpande Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #newbook #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-12-2521 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor34. शह आणि काटशह | Dr Rajeev Joshi | Dr Shreeram Geet | Book ReivewBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shah-ani-katahah-shaha-aanae-katashahaवैद्यकीय क्षेत्र हे त्यातल्या कामच्या तासांमुळे, इमरजन्सी केसेसमुळे कमालीचं धकाधकीचं तर असतंच पण ते तितकंच स्पर्धेचं आणि चुरशीचंही असतं. ही चुरस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यापासूनच सुरू होते. डॉ. राजीव जोशी लिखित शह काटशह हे पुस्तक १९८७ साली घडलेली अशीच एक सत्यकथा उलगडते. ही कथा आहे वैद्यकीय प्रवेशांमध्ये होणाऱ्या गोंधळाची, त्याविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लढ्याची, प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची. वैद्यकीय क्षेत्राची सामान्यांना अपरिचित अशी ही बाजू उलगडणाऱ्या या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: Shah ani KatshahAuthor: Dr. Rajeev Joshi Podcast Host: Dr Shreeram Geet Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #newbook #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-12-1835 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor33. गाता रहे | Book Reivew | Suhas Kirloskar | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/gata-rahe-gata-rahaसंगीत मग ते जुने असो वा नवे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत ते आवडीनं ऐकणारे आपल्यासह आजूबाजूला अनेकजण दिसतात. पण गीताचा-संगीताचा आस्वाद घेत आपण खरंच ते ऐकतो का? काय म्हणता? हा आस्वाद नेमका कसा घ्यायचा? सुहास किर्लोस्कर लिखित गाता रहे हे पुस्तक चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताच्या आस्वादाची अनोखी मैफील साकारतं. अल्पावधीतच दुसरी आवृत्ती येत असलेल्या गाता रहे विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: Gata RaheAuthor: Suhas Kirloskar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #gatarahe #suhaskirloskar #newbook #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-12-1135 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor32. नंदीघोष यात्रा - श्रीकृष्णकथा: वेध नवा | Satish Mutatkar | Yashwant Marathe | Rajhans PrakashanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nandighosh-yatra-nathaghashha-yatara-sharakashhanaekatha-vathha-navaकृष्ण हे कालातीत प्रेरणास्थान आहे. त्याच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणारं नंदीघोष यात्रा श्रीकृष्णकथा वेध नवा हे पुस्तक हे नुकतंच दाखल झालं आहे. हे पुस्तक सतीश मुटाटकर आणि यशवंत मराठे यांनी लिहिलं असून पुस्तकाचा अनुवाद डॉ. शुचिता नांदापूरकर फडके यांनी केला आहे. Book: Nandighosh YatraAuthor: Satish Mutatkar and Yashwant MaratheMarathi Translator: Dr. Shuchita Nandapurkar PhadkePodcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #nandighoshyatra #bookreview Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-12-0434 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor31. पुनश्च हनिमून | Sandesh Kulkarni | Amruta Subhash | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/punashcha-honeymoon-panashaca-hanamanaही गोष्ट आहे सुहास आणि सुकन्याची. त्यांच्या पहिल्या लग्नाच्या दुसऱ्या हनिमूनची. पण लग्नानंतर सात वर्षांनी माथेरानला त्याच हॉटेलमध्ये पोचल्यावर बरंच काही विस्कटलंय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करतीय. पण नकळत उसवत चाललेल्या नात्याची ही गोष्ट फक्त त्या दोघांची रहात नाही. पस्तिशी-चाळीशीतल्या अनेक जोडप्यांच्या जगण्याशी-सहजीवनाशी जाऊन ती भिडते. या कथेचा रंगमंचीय अविष्कार म्हणजे संदेश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित पुनश्च हनिमून हे नाटक. या विलक्षण वेगळ्या धाटणीचं नाटक नुकतंच पुस्तक रूपात राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. यानिमित्तानं संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्यासोबत रंगलेला संवाद राजहंसी मोहोर पॉडकास्टद्वारे घेऊन आलोय. Book: Punasch HoneymoonAuthor: Sandesh KulkarniGuest: Amruta Subhash Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #punaschhoneymoon #sandeshkulkarni #amrutasubhash Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-11-2739 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki | Rajhans PrakashanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/abhishekee-pandit-jitendra-abhisheki-abhashhaka-padata-jatathara-abhashhakaपं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.Book: AbhishekiAuthor: Shaila Mukund Podcast Host: Dr Sadanand Borse Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #jitendraabhisheki #shaunakabhisheki #bookreview Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-11-2029 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा! | Vasundhareche Shodhyatri | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vasundhareche-shodhayatri-vasathharaca-shathhayataraप्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: Vasundhareche Shodhyatri Author: Dr. Anurag Lavhekar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #newbook #marathi #dranuraglavhekar #bookreview Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-11-1330 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor28. आपण एका टकमक टोकाकडे चाललोय? | Atul Deulgaonkar | NisargakallolBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nisargakallol-nasaragakallliकुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच: हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगणारं निसर्गकल्लोळ हे पुस्तक घेऊन लेखक, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आले आहेत.Book: NisargakallolAuthor: Atul Deulgaonkar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K StudioProduced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #atuldeulgaonkar #marathiliterature #rajhansprakashan #nisargakallol Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-11-0634 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor27. वस्त्र परंपरेचा अनमोल ठेवा | Vastragatha | Vinay NarkarBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vastragatha-vasataragathaअन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.Book: Vastragatha Author: Vinay NarkarPodcast Host: Dr Sadanand Borse Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#vinaynarkar #drsadanandborse #newbook #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-10-2337 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor26. दंव भिजली वही | Himanshu Kulkarni | Marathi Poetryकवितासंग्रहाची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/davbhijaleee-vahee-thava-bhajal-vaha"फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे." - मंगेश पाडगावकरBook: Davbhijalee Vahee Poet: Himanshu KulkarniPodcast Host: Vandana Bokil-Kulkarni Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#davbhijaleevahee #marathipodcasts #poetry Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-10-1633 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor25. आनंदाच्या दाही दिशा: मुक्त मुशाफिरी | Dr. Aarati Ranade | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/anandachya-dahee-disha-aanathacaya-thaha-thashaही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर कधी स्वत:च्या मनात डोकावून प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे गुंते समजावून घेण्यासाठी केलेली. हेतू, साधने आणि साध्य काहीही असो, आहे कमालीची आनंददायी आणि चिंतनगर्भ.Book: Anandacha Dahi Disha Author: Dr. Aarati RanadePodcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#anandachadahidisha #rajhansprakashan #newbook #draaratiranade Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-10-0934 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor24. विशेष संवाद: चंद्रकांत कुलकर्णी | उत्तरार्ध | Chandrakant Kulkarni | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aahaप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबतच्या विशेष संवादाचा हा उत्तरार्ध..कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.Book: Chandrakant Kulkarni Sadar Karit Aahe Author: Chandrakant KulkarniPodcast Host: Prashant Dixit Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#chandrakantkulkarni #marathitheatre #newbook Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-10-0234 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor23. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...| Director Chandrakant Kulkarni | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aahaकवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.Book: Chandrakant Kulkarni Sadar Karit Aahe Author: Chandrakant KulkarniPodcast Host: Prashant Dixit Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#chandrakantkulkarni #marathitheatre #newbook Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-09-2531 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor22. द सिक्रेट मिशन: एका अद्भुत रहस्याच्या मागावर... | Marathi Podcast | Rajhans PrakahsanBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/the-secret-mission-tha-sakarata-mashanaमराठी साहित्यात रहस्य कथांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे. आजही रहस्यकथा मोठ्या आवडीनं वाचल्या जातात. रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर आणि गुरूनाथ नाईक यांच्या सन्मानार्थ राजहंस प्रकाशनानं घेतलेल्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेतली द्वितीय क्रमांक विजेती कादंबरी म्हणजे 'द सिक्रेट मिशन'. या अनोख्या कादंबरीविषयी चर्चा करूया या भागात.Book: The Secret MissionAuthor: Radhika Kulkarni Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #secretmission #marathinovel #marathibooks Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-09-1828 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor21. चंद्रशेखर: जसं जगलो तसं | Chandrashekhar | Marathi PodcastChandrashekhar Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrashekhar-catharashakhara-jasa-jagal-tasa१९९० च्या दशकात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांनी आणि सीमा प्रश्नांनीही देश धुमसत असताना १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. चंद्रशेखर यांच्याविषयी आजच्या पिढीला विशेष माहिती नाही. समाजवादी विचारसरणीच्या मुशीत घडलेल्या, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि १९८३ साली भारत यात्रेद्वारे देश पिंजून काढलेल्या चंद्रशेखर यांनी ‘जीवन जैसे जिया’ या आपल्या आत्मचरित्रात आपला जीवनप्रवास उलगडला आहे. जसं जगलो तसं… या नावानं या चरित्राचा मराठी अनुवाद केलाय लेखक-ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी. याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.Book: Chandrashekhar - Jasa Jaglo TasaTranslator: Ambarish MishraPodcast Host: Niranjan MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Mohini MedhekarProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#chandrashekhar #primeminister #ambarishmishra Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-09-1127 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor20. सत्यघटनेवर आधारित अद्भुत कादंबरी | ज्याचं त्याचं एव्हरेस्ट | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/jyache-tyache-everest-jayaca-tayaca-evaharasataहिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात? पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील? एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!Book: Jyache Tyache EverestAuthor: Mrunalini Chitale Podcast Host: Vinaya Khadpekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production, Design and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #newbook #marathiliterature #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-09-0432 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor19. समृद्ध, भावसंपन्न गोंदणखुणा | Marathi PodcastGondankhuna Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/gondankhuna-gathanaekhanaeएखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे.Book: GondankhunaAuthor: Priya NigojkarPodcast Host: Mohini MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Niranjan MedhekarProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#newbook #marathi #gondankhuna #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-08-2828 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor18. बाईची कथा आणि व्यथा मांडणारी कादंबरी | Being a Woman | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/bai-ga-bya-gaबाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... ‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं...Book: Bai GaAuthor: Vidya Pol-Jagtap Podcast Host: Vandana Bokil-Kulkarni Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #newbook #marathi #baiga #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-08-2127 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor17. All about National Education Policy 2020 | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nave-shaikshanik-dhoran-nava-shakashhanaeka-thharanaeनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० ही आपल्या राज्यात यंदापासून अमलात येतीय. त्यामुळे मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत, काहीशी धास्ती आहे. आता यापुढे दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा जाऊन नवीनच पॅटर्न येणार का? पदवी खरंच चार वर्षांची होणार का? कला, विज्ञान, वाणिज्य हा पारंपरिक शाखाभेद संपून येणारी क्रेडिट पॉलिसी नेमकी कशी असेल? मातृभाषेत शिकण्याला महत्त्व दिल्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं महत्त्व कमी होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. १९८६ नंतर म्हणजेच तब्बल ३८ वर्षांनंतर देशाचं शैक्षणिक धोरण बदलत असल्यानं हे प्रश्न पडणं साहजिक आहेत. त्यामुळेच या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या शब्दांत उत्तरं देणारं ‘नवे शैक्षणिक धोरण: विद्यार्थी पालकांसाठी मार्गदर्शन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले लिखित या नवीन पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.Book: Nave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-palakansathi margadarshanAuthor: Prof. Dr. Nitin Karmalkar & Mangala GodbolePodcast Host: Shirish Sahasrabuddhe and Niranjan MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Mohini MedhekarProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#nationaleducationpolicy #indianeducation #newpolicy #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-08-1436 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor16. स्वतंत्रपण एकल राहणाऱ्या स्त्रीचं आत्मकथन | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vivah-nakartana-vavaha-nakaratanaहे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य. पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा? तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?Book: Vivaha NakartanaAuthor: Vinaya KhadpekarPodcast Host: Aarti GhareSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Niranjan MedhekarProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#life #marriage #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-08-0728 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor15. युद्धानंतर: युद्धग्रस्त स्थितीचा काव्यमय आढावा | Aditya Davane | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/yuddhanantar-yathhathanataraकोणत्याही संवेदनशील माणसाला युद्ध नको असतं. पण प्रत्यक्षात असं होत नाही. माणसांना असंवेदनशील करणारी युद्धं हा चिंतेचा विषय घेऊन आदित्य दवणे युद्धानंतर हा कवितासंग्रह घेऊन आले आहेत. आजच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या या कवितासंग्रहाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: Yuddhanantar Poet: Aditya Davane Podcast Host: Mohini MedhekarSignature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #warzone #poetry #literature #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-07-3130 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor14. Story of a Real-life Phoenix who Rose from the Ashes | Sonali Navangul | Wg Cdr Ashok LimayeBook Link of Rakhetun Ugavteekade: https://www.rajhansprakashan.com/product-details/rakhetoon-ugavateekade-rakhatana-ugavatakadaही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च ‘ राखेतून उगवतीकडे’ निग्रहाने झेपावतो, त्याची होय.Book: Rakhetun Ugavteekade Translated by: Sonali Navangul Podcast Host: Karuna Gokhale Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #iaf #inspiration #newbook #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-07-2433 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor13. Literary Tale of TV and Soap Operas | Mugdha Godbole | Marathi PodcastBook Link of TV, Malika ani Barach Kahi - https://www.rajhansprakashan.com/product-details/tv-malika-ani-barach-kahi-tavaha-malka-aanae-braca-kahaआजवर एकदाही टीव्ही पाहिला नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. त्यात तो मराठी असेल तर एकही मालिका कधी बघितली नाही असा माणूस मिळणार नाही. त्यामुळेच आठवड्याचे पाच-सहा दिवस दररोज न चुकता टिव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या मालिका नेमक्या उभ्या कशा राहतात, त्या चालतात कशाच्या जोरावर आणि इतक्या मोठ्या उद्योगाची पडद्यावरची तसंच पडद्यामागची सूत्र हलवतं कोण याचा रंजक आढावा मुग्धा गोडबोले यांनी ‘टीव्ही, मालिका आणि बरंच काही…!’ या त्यांच्या नवीन पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Actress-writer Mugdha Godbole has taken a detailed overview of television and soap operas in her new book TV, Malika ani Barach Kahi.Book: TV, Malika ani Barach Kahi Author: Mugdha Godbole Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #tv #soapoperas #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-07-1733 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor12. रोहिणी निरंजनी: कथक गुरू रोहिणी भाटे जन्मशताब्दी विशेषRohini Niranjani Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/rohini-niranjani-rahanae-narajanaज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. ‘जाणिजे यज्ञकर्म’ या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अ‍ॅकॅडेमेशियन - अशा परिपूर्ण कलाकार - ‘टोटल आर्टिस्ट’- रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे रोहिणी निरंजनीBook: Rohini NiranjaniAuthor: Vandana Bokil-KulkarniPodcast Host and Book Narration: Gauri DeshpandeSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Mohini MedhekarProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#RohiniBhate #RohiniNiranjani Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-07-1029 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor11. औरंगजेब, दरोडा आणि Artificial Intelligence! | 1695 | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/1695धूर्त, कपटी, संशयी अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेब बादशहाला १६९५ साली एका ब्रिटिश समुद्री दरोडेखोरानं मोठाच गंडा घातला. औरंगजेबाच्या मालकीचं गंज-ई-सवाई हे अवाढव्य जहाज त्या वर्षी लुटण्यात आलं होतं. विशेष म्हणजे औरंगजेबानं जंग जंग पछाडूनही तो त्या दरोडेखोरापर्यंत शेवटपर्यंत पोचूच शकला नाही. हा जिव्हारी लागलेला अपमान विसरत औरंगजेबानं या दरोड्याचा तपास का थांबवला असेल, याचा शोध आजच्या आर्टिफिशल इंटलिजन्सच्या साहाय्यानं घेण्याचा प्रयत्न म्हणजे सुरेश वांदिले यांची १६९५: स्मार्ट रोबो, एआय व औरंगजेब ही कादंबरी आहे. या आगळ्यावेगळ्या कादंबरीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: 1695: Smart Robot AI ani Aurangzeb Author: Suresh Vandile Podcast Host and Book Narration: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #1695 #aurangzeb #artificialintelligence #newbook Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-07-0329 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor10. सीतेच्या अप्रकाशित तेजस्वीतेवर प्रकाश टाकणारी कादंबरी..सीता | Abhiram Bhadkamkar | SeetaSeeta Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/seeta-sataसीतेच्या अप्रकाशित तेजस्वीतेवर प्रकाश टाकणाऱ्या लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर लिखित सीता या कादंबरीची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत.Book: सीता | SeetaAuthor: Abhiram Bhadkamkar Book Narration: Rekha MajgaonkarPodcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-06-2642 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor9. सायबर अटॅक्सचा थरारक मागोवा | Cyber Crimes | Marathi PodcastCyber Attack Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/cyber-attack-sayabra The acute rise in cyber crimes raised many concerns about finance, investment and money management. Cyber Attack book takes us into the dark world of cyber frauds, gives glimpses of investigations and addresses preventive measures to maintain a safe distance to save our hard-earned money.  सायबर क्राईम्स हे नुसते आपल्या दारापर्यंत येऊन थांबले नाहीयेत तर खिशातल्या स्मार्टफोनमुळे शब्दशः एका क्लिकवर आले आहेत. ऑनलाईन विश्वातल्या या स्मार्ट चोरांचा सामना कसा करायचा हा प्रश्न आज प्रत्येकाला भेडसावतोय. राजहंस प्रकाशनाचं सायबर अटॅक हे नवीन पुस्तक सायबर क्राईमचं अस्पर्श आणि थरारक असं विश्व उलगडतं. या अनोख्या पुस्तकाची ओळख आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत. Book: सायबर अॅटॅक | Cyber AttackAuthor: Dr. Sanjay Tungar and Sudhir Sabale Book Narration: Sachin Pandit Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-06-1932 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor8. आर्थिक गुन्हेगारांच्या मागावर | Apurva Joshi | Marathi PodcastBook Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/aarthik-gunhegariche-antarang-aarathaka-ganahagaraca-ataraga दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये, या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा कैक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन अशा लबाड कंपन्यांनी. त्यामुळंच प्रश्न पडतो की हे आर्थिक घोटाळे नेमके घडतात कसे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्यांचे सूत्रधार शोधतं कोण? अपूर्वा प्रदीप जोशी लिखित ‘आर्थिक गुन्हेगारीचं अंतरंग’ हे नवीन पुस्तक फायनान्शियल फ्रॉड्सचं विलक्षण गुंतागुंतीचं विश्व उलगडतं. या पुस्तकाची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत.  Book: आर्थिक गुन्हेगारांच्या मागावर | Arthik Gunhegarancha Magavar  Author: Apurva Pradip JoshiBook Narration: Rekha Majgaonkar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-06-1232 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor7. निसर्ग शब्दबद्ध करणारा अवलीया | पर्यावरण दिन विशेष | Dilip Kulkarniदिलीप कुलकर्णी यांच्या पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/dileep-kulkarni  In this special podcast on the occasion of World Environment Day writer-environmentalist Dilip Kulkarni shared his thoughts on green life and his writing journey spanning over 38 years.  निसर्ग-पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करताना केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही, आपण तसं जगायलाही हवं असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे १९९३ साली त्यांनी पुणं-पुण्यातली उत्तम नोकरी हे सगळं कायमचं सोडलं. कोकणातल्या एका खेड्यात जाऊन ते कुटुंबासह स्थायिक झाले. गेली ३१ वर्ष निसर्गस्नेही जीवनाचा ध्यास पुढे नेतानाच लिखाणाचा वसाही ते नेटानं पुढे नेत आहेत. प्रसिद्ध लेखक आणि पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांच्या ३८ वर्षांच्या लेखन प्रवासाविषयी आणि त्यांच्या विलक्षण जगण्याविषयीही जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.  Book: Tantramukti and other booksAuthor: Dilip Kulkarni Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-06-0533 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor6. वर्धापन आणि वारसा राजहंसचा | Anniversary Special EpisodeRajhans Prakashan is celebrating 72nd Anniversary on 1st June 2024. In this special episode, Director Dilip Majgaonkar and Dr. Sadanand Borse shared the illustrious seven-decade journey and major milestones of Rajhans.  मराठी साहित्यविश्वात मोलाचं योगदान नोंदवत असलेल्या, मराठी साहित्यातल्या गोल्डन पिरियडचं साक्षीदार असलेल्या, आणि ताज्या दमाच्या लेखकांकडून आजही अविरतपणे उत्तम साहित्याची निर्मिती करत असलेल्या राजहंस प्रकाशनाचा १ जून हा वर्धापनदिन. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि श्री. ग. माजगावकर यांनी १९५२ मध्ये म्हणजेच बरोबर ७२ वर्षांपूर्वी राजहंसची स्थापना केली. सात दशकांहून अधिक गौरवशाली वारसा लाभलेल्या या राजहंसी वाटचालीविषयी जाणून घेऊया राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे यांच्याकडून.  वाणी आणि लेखणी तसेच पत्र आणि मैत्र या ग्रंथांच्या लिंक्स - https://www.rajhansprakashan.com/product-details/dileep-majgaonkar-2-books  Special Guests: Dilip Majgaonkar and Dr. Sadanand Borse Book Narration: Aniruddha DadkePodcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-06-0151 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor5. सवाष्ण: वाड्याच्या गूढ गर्भात | Suspense Thriller Novel | Marathi PodcastSavashna Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/savashna-savashhanae Dr. Kshama Govardhane Shelar, the author of Savashna novel talks about her writing journey, why she chose this particular segment and how she relates the fictitious characters of her new novel? वाड्याच्या भग्न भिंती, पुसट झालेली भित्तीचित्रं, अंधारा निमुळता जिना, चौकातली दगडी फरसबंदी आणि एका खोलीत कोंडलेली भ्रमिष्ट व्यक्ती…रहस्य, गूढ, भयरसांनी युक्त अशी कादंबरी कुणाला आवडणार नाही? राजहंस प्रकाशनाच्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धा विजेती सवाष्ण या कादंबरीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.   Book: Savashna Author: Dr. Kshama Govardhane Shelar Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-05-2924 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor4. करिअर निवडीचा पेच सोडवायचा कसा? | Dr. Shriram Geet | Career CounsellorBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/karaara-kasa-navadava-career-kasa-nivdava Dr Shriram Geet explains various career paths available after Class 10 and Class 12, whether to think of going abroad for higher studies and how to develop soft skills in children at a younger age.  दहावी-बारावीचे निकाल तोंडावर आलेत. विद्यार्थ्यांनी यापुढची शिक्षणाची वाट निवडताना ती केवळ मार्कांवर ठरवावी की आपला कल-आवड आणि क्षमता यांचाही आढावा घ्यावा? मुळात ज्या शाखेत-अभ्यासक्रमाला जायचंय त्यामध्ये आपल्याला गती आहे हे कसं ओळखायचं? पिअर प्रेशर किंवा पालकांचा दबाव कसा टाळायचा? पालक-मुलांमध्ये यासंदर्भात संवाद नेमका कसा हवा? या सगळ्या कळीच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया प्रसिद्ध लेखक, डॉक्टर आणि करियर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत यांच्याकडून. Book: Career Kasa Nivadava Author: Dr. Shriram Geet Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-05-2240 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor3. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांची इरसाल पत्रापत्री | Dileep Prabhavalkar | Vijay KenkareBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/patarapatara-patrapatri तात्यासाहेब आणि माधवराव हे जिवश्चकंठश्च मित्र! त्यांच्या मैत्रीचं वेगळेपण म्हणजे आजच्या मोबाईल-इंटरनेटच्या युगातही त्यांचा अखंड सुरू असलेला पत्रव्यवहार. या पत्रांतून कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो, तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. फक्त फॉरेनच्या गोष्टी नाही काही, आयपीएलपासून ते फ्लेक्सबाजीपर्यंत देशी गोष्टींवरचं भाष्यही या पत्रांतून समोर येतं. ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या तिरकस लेखणीतून साकारलेल्या पत्रापत्री या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया दस्तुरखुद्द प्रभावळकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेते विजय केंकरे यांच्याकडून.   Book: PatrapatriAuthor: Dileep Prabhawalkar Book Narration: Dileep Prabhawalkar and Vijay Kenkare Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-05-1538 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor2. पालकत्वाचं परफेक्ट गाईड | Parenting Tips | Marathi PodcastPriya Palak Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/priya-palak Written by Dr. Vaishali Deshmukh Rajhans Prakashan's latest title Priya Palak is a perfect parenting guide. This episode includes interaction with the author Dr. Deshmukh along with narration of a select few important chapters.  अडनिड्या वयात मुलं जेवढी भांबावलेली असतात ना त्याही पेक्षा आपलं मूल असं का वागतंय या आणि अशा अनेक प्रश्नांनी गोंधळलेल्या पालकांना एका फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडची गरज असते. याच स्वरूपाचं राजहंस प्रकाशनाचं डॉ. वैशाली देशमुख यांनी लिहिलेलं प्रिय पालक हे पुस्तक मार्च २०२४ मध्ये प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाची ओळख आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत. Book: Priya Palak Author and Guest: Dr. Vaishali Deshmukh Book Narration: Aparna Joag Podcast Host: Mohini Medhekar Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-05-0736 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor1. दुर्दम्य : भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा | Rajhans Prakashan| Marathi PodcastIn this first episode, we interacted with Maj Gen (Retd.) Shashikant Pitre about his latest title Durdamya in which he penned biographies of six officials from Indian tri-services.  दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्यप्राय उद्दिष्टही गाठता येऊ शकतात. मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे लिखित दुर्दम्य हे पुस्तक म्हणजे सैन्यातील उत्तुंग नेतृत्वाची आणि विलक्षण शौर्याची जणू सोनेरी पानं आहेत. भारतीय सैन्यदलांत आपली अमीट मुद्रा उमटवलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा जाणून घेऊया या एपिसोडमध्ये! Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/durdamya-tharathamaya-bharataya-sanaya-natatatavaca-utataga-shakhara Book: Durdamya Author and Guest: Maj Gen Shashikant Pitre Book Narration: Nachiket Devasthali Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-05-0128 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohorराजहंसी मोहोर | Rajhansi MohorRajhansi Mohor | Trailer EpisodeRajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune-based leading publication house Rajhans Prakashan, with a literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Voice Over : Sachin PanditProduced By : Rajhans Prakashan, PuneProduction and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP, Pune  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices2024-04-3001 minMarathi KhidkitunMarathi Khidkitunमराठी प्रकाशकांच्या तीन सहोदर जोड्याआपल्या मराठी भाषेतील नियतकालिके आणि पुस्तके संपादन करणाऱ्या आणि प्रकाशित करणाऱ्या तीन बंधूद्वयां बद्दल आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.In this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh speak about Mauj Prakashan, Rajhans Prakashan and Majestic Prakashan. The common factor among these publications is all the three were run by brothers; this episode speaks about the rise of these publications and its glory. You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app.You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/See omnystudio.com/listener for privacy information.2022-06-1415 min